Udayanraje Bhosale: प्रतापगडावरील भवानीमातेची खा. उदयनराजेंच्या हस्ते आरती

किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेची खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, छ. सौ. दमयंतीराजेभोसले यांनी आरती केली.
Udayanraje Bhosale |
किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेची खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, छ. सौ. दमयंतीराजेभोसले यांनी आरती केली.Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : किल्ले प्रतापगड येथील श्री भवानीदेवीची दसर्‍याच्या पूर्वसंध्येला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांनी आरती केली. यावेळी उदयनराजे व दमयंतीराजेंच्या हस्ते देवीची पूजाही करण्यात आली. यावेळी गडावर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी विजयादशीचा सण साजरा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पूर्वसंध्येला खंडेनवमीचे औचित्य साधत खा. उदयनराजेंनी सपत्नीक भवानीदेवीची आरती व पूजा केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, रूढी - परंपरेनुसार दरवर्षी नेहमीच अष्टमीला प्रतापगडावरील भवानी देवीच्या पूजेला आणि दर्शनाला येत असतो. त्याचप्रमाणे यंदाही भवानी देवीची आरती केली आहे.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त लोकांना जास्तीत जास्त संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्यावी. असे साकडे देवीकडे घातले आहे. दरम्यान, प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून शक्य तेवढी मदत पूरग्रस्तांना करावी, असे आवाहन खा. उदयनराजेंनी केले.

राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र परिस्थिती वाईट झाली. शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शाही दसरा महोत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्यामुळेच यावर्षी होणारा शाही दसरा रद्द करून तो साधेपणाने साजरा करून पूरग्रस्तांसाठी मदत करावी. इतरही विविध सामाजिक संस्था व नागरिकांनी मदतीचा हात पुढे करावा.
- खा. उदयनराजे भोसले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news