साखरवाडीत गांजा विक्रेत्यांनी पोलिसाला फरफटत नेले

Drug trafficking: एक ताब्यात; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
drug peddlers attack
साखरवाडी येथे याच चारचाकीतून गांजाची तस्करी होत होती.pudhari photo
Published on
Updated on

साखरवाडी : साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत गांजाची वाहतूक करणार्‍या संशयितांनी पोलिसाला फरफटत नेल्याची घटना घडली आहे. या झटापटीत संशयित पळून जात असताना त्याची कार झाडाला धडकली. यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत साडेपाच लाखांचा साडेदहा किलो गांजा जप्त केला आहे.

लक्ष्मण रामू जाधव (वय 60, रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व रणजित लक्ष्मण जाधव अशी संशयितांची नावे आहेत. यातील लक्ष्मण जाधव याला ताब्यात घेतले आहे. संशयितांवर यापूर्वी गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी म्हसवड, लोणंद व माळशिरस पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. एका कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. संबंधित कार सुरवडीतून साखरवाडीत गेल्यानंतर पोलिसांनी ती थांबवली.

पोलिस संशयितांकडे तपासणी करत असताना दोघांपैकी एका संशयिताने कारचा दरवाजा ओढला तर चालकाने वाहन सुरू केले. यामध्ये एका पोलिसाचा हात कारच्या दारात सापडला. तरीही संशयितांनी पोलिसाला फरफटत नेत कार पळवली. यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली. यानंतर चालक पसार झाला. तर दुसर्‍या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, पोलीस हवालदार नितीन चतुरे, तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोना अमोल पवार, अमोल देशमुख यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news