Satara Crime: काळज येथे दुसऱ्यासोबत राहणाऱ्या पत्नीचा खून

काळज (ता. फलटण) येथे पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या कारणावरून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली
Murder
MurderPudhari
Published on
Updated on

लोणंद : काळज (ता. फलटण) येथे पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या कारणावरून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह तीन दिरांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पतीला अटक केली आहे.

गुड्डी बाक्या शिंदे (वय 35, रा. ठाकूरकी, ता. फलटण) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बाक्या युरोपियन शिंदे, दीर लोज्या युरोपियन शिंदे, दीर प्रित्या युरोपियन शिंदे, दीर कबुल्या गुदन शिंदे (सर्व राहणार ठाकूर की ता. फलटण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अंकुश चव्हाण (रा. ठाकूरकी) याच्यासोबत पत्नी गुड्डी राहत असल्याचा राग मनात धरून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादी शाकुबाई जालिंदर पवार (वय 50, रा. बडेखान घाडगे मळा, ता. फलटण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला हिला परत घेऊन जाण्यासाठी पती व नातेवाईक आले होते. मात्र, ती त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यात मारहाण करून तसेच कापडाच्या टॉवेलने गळा आवळून तिचा खून केला, असे आरोप फिर्यादीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news