

कराड : सैदापूर ता. कराड मधील पावकेश्वर मंदिराची माहिती पंचक्रोशीतील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला व्हावी यासाठी दैनिक ‘पुढारी’ने माहितीपूर्ण लेख प्रसिध्द केला होता. या लेखाची फोटो फ्रेम बनवून दादाराम साळुंखे यांनी मंदिर व्यवस्थापनास भेट दिली.
लेखाच्या माध्यमातून पावकेश्वराचे महात्म्य संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी येणार्या भाविकांना मंदिराचा इतिहास कळावा या उद्देशाने ही फ्रेम प्रा. डॉ. दादाराम साळुंखे यांनी भेट दिली.