Dhande bridge: ब्रिटिशकालीन धांडे पूल जमीनदोस्त

पाटणमध्ये नवीन पूल उभारणीचा मार्ग मोकळा; पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू
Dhande bridge
Dhande bridgePudhari
Published on
Updated on

पाटण : कराड-चिपळूण महामार्गावरील पाटण शहरातील केरा पूल ते रामापूर दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील शहरातील धांडे पुलाची रुंदी व उंची वाढविणे अत्यावश्यक झाले होते. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ब्रिटीशकालीन धांडे पूल बुधवारी सकाळी जेसीबीच्या सहायाने जमीनदोस्त करण्यात आला.

प्रशासनाच्या देखरेखीखाली संबंधित विभागाने अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने पूल पाडण्याची कार्यवाही केली. अनेक वर्षांपासून वाहतुकीचा भार सहन करणारा हा पूल मोडकळीस आला होता. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर तो अपुरा ठरत असल्याने नवीन, अधिक मजबूत व सुरक्षित पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धांडे पूल पाडण्यात येणार असल्याने सकाळी मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी गर्दी करत या ऐतिहासिक पुलाच्या अखेरच्या क्षणांचे साक्षीदार झाले.

काहींनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुलाशी असलेले आपले भावनिक नातेही व्यक्त केले. पूल पाडल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले असून प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

नवीन पूल उभारणीचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून तो अधिक उंच, रुंद आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत असेल. त्यामुळे भविष्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. पूल पाडण्याची संपूर्ण कारवाई सुरक्षित आणि सुरळीत पार पडली असून कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news