Panchgani Double Murder Case : दुहेरी खूनप्रकरणातील संशयितांची पाचगणी पोलिसांकडून शोधमोहीम

आपली ओळख लपवून पर्यटन परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर
Panchgani Double Murder Case
दुहेरी खूनप्रकरणातील संशयितांची पाचगणी पोलिसांकडून शोधमोहीमFile Photo
Published on
Updated on

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाणे हद्दीत वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराने पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटनस्थळांचा आसरा घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन खुनांच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी आपली ओळख लपवून पर्यटन परिसरात वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी 2026 रोजी अर्धापूर ते भोकरफाटा मार्गावरील जांभरुण शिवारात 70 वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तपासादरम्यान संबंधित संशयिताचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान संशयित पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांवर वावरत असल्याचे संकेत पोलिसांना मिळाले आहेत. सदर संशयित हा हॉटेलमध्ये वेटर किंवा कूक म्हणून काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील हॉटेल, लॉजिंग, रिसॉर्ट तसेच खानावळ चालकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटन हंगामामुळे बाहेरील व्यक्ती मोठ्या प्रमाणात परिसरात येत असल्याने अनोळखी व्यक्तींना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची पूर्ण शहानिशा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, संशयित व्यक्ती आढळल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पाचगणी पोलिस, अर्धापूर पोलिस ठाणे किंवा नांदेड पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पाचगणी पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप पवार यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news