

सातारा : पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिलार येथील हिराबाग हॉटेलमध्ये चाललेल्या छमछम प्रकरणात सर्व 20 शौकीनांना नोटीसा दिल्या असून पुढे अटकेची कारवाई होवून त्यांच्यावर न्यायालयात खटला चालणार आहे. संशयित सर्वजण सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील खत दुकानदार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्यांच्या काही अलिशान कार व महागडे मोबाईल जप्त केले आहेत.
दिपक अण्णा रासकर (वय 37, रा. मांडवे ता.माळशिरस, जि.सोलापूर), प्रदीप जयसिंग दळवी (वय 45, रा. निमसाखर ता.इंदारपूर जि.पुणे), राहूल अंकुश बांदल (वय 38, रा. जांभ ता.इंदापूर), प्रशांत हणमंत बिजर्गे (वय 39, रा. उमदी ता.जत जि.सांगली), मल्लीकार्जुन अमोगसिध्द होनमाने (वय 32, रा. सोनलगी ता.जत), रमेश संभाजी माळी (वय 35, रा.जत), सागर प्रभाकर जाधव (वय 36, रा.मणेराजुरी ता.तासगाव जि.सांगली), दिलीप थाबरु चव्हाण (वय 25, रा. कागनेरी ता.जत), तुकाराम आप्पासो जगताप (वय 32, रा. हुमदी ता.जत), अमोल रत्नाकर कवठेकर (वय 46, रा. नाशिक), भिमाशंकर भैरप्पा नाव्हे (वय 30, रा. सोनलगी ता.जत), हमशिद सुरेश पुजारी (वय 29, रा. निंबरी ता.चरवंड जि.विजापूर), ऋषीकेश संभाजी औताडे (वय 26, रा.तासगाव जि.सांगली), संतोष सुनील पाटील (वय 28, रा.तासगाव), चंद्रशेखर महादेव बिराजदार (वय 34, रा. अकलवाडी ता.जत), संदीपसिंग गजेंद्रसिंग राठोड (वय 30, रा. बलरामनगर, तेलंगणा), विनोद सोमलिंग अलगुडे (वय 40, रा. वालगाव ता.जत), शिवानंद हणमंत बिराजदार (वय 35, रा. बरडोल ता.इंडी जि.विजापूर), महेश मोहन पाटील (वय 40, रा. चिंचणी ता.तासगाव), हणमंत रंगराव गायकवाड (वय 39, रा. चिंचणी ता.तासगाव), गजानन भाऊसो भिलारे (वय 68, रा. भिलार कासवंड ता.महाबळेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पाचगणी पोलिसांनी दि. 7 जानेवारी रोजी भिलार कासवंड येथील हिराबाग या हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत एकूण 25 लाख 45 हजार 500 रुपये किंमतीच्या कार, मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिस तानाजी शिंदे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, संशयित 21 जणांनी 12 बारबाला आणून नाचवल्या. तसेच बिभत्स कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली दोन दिवस शौकीनांवर कारवाईचा दंडुका उगारला. संशयितांना पोलिसांनी नोटीसा दिल्या असून त्यानुसार पुढे त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर संशयितांवर खटला चालणार आहे.
सर्व संशयित वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. या सर्वांना एकत्र आणण्याचे काम अमोल कवठेकर या नाशिककराने केले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याने ही पार्टी जमवली. हॉटेल चालक गजानन भिलारे असल्याने त्याचे नाव एफआयआरमध्ये आले आहे. दरम्यान, संशयित सर्वांची वाहने जप्त केल्याने त्यांना न्यायालयीन प्रक्रिया करुन वाहने सोडवून घ्यावी लागणार आहेत. तोपर्यंत पोलिसांकडे जप्त म्हणून ती वाहने राहणार आहेत. दरम्यान, बारबाला यांचे समूपदेशन करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.