खंडोबाच्या पालला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणार

मंत्री शंभूराज देसाई : आ. मनोजदादा घोरपडे यांच्या पुढाकाराने बैठक
 शंभूराज देसाई
शंभूराज देसाई File Photo
Published on
Updated on

सातारा : कराड तालुक्यातील पाल देवस्थान ’ब’ वर्गाचे देवस्थान आहे. या देवस्थानाला येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असून त्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘पाल’ देवस्थानाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पाल (ता.कराड) येथील ’ब’ वर्ग देवस्थान येथे भाविक व पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एकात्मिक धार्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व ‘पर्यटन पोलिस’ या विषयासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उत्तर कराडचे आमदार मनोज घोरपडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, पर्यटन विभागाचे उपसचिव पवार, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी. एन. पाटील आदी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, ‘पाल’ला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा विचार करुन परिपूर्ण प्रस्ताव एक महिन्याच्या आत सादर करावा. तसेच पर्यटनासाठी शासकीय जागेस प्राधान्य देण्यात यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news