

पिंपोडे बुद्रुक : लोणंद ते सातारा मार्गावर पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक ठार झाला. तर टेम्पोमधील हमाल गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
या अपघातात गणेश भीमराव खोसे (वय 34, रा. जळगाव ता. गेवराई जि. बीड) यांचा मृत्यू झाला आहे. तर सुधाकर मोतीराम गिरे (वय 42, रा. सोनरवास पो. बागरबांदी ता. मालेगाव जि. वाशीम) गंभीर जखमी झाले आहेत. लोणंदहून साताऱ्याकडे जात असलेला टेम्पो (क्र. एमएच 16 डीपी 3326) पिंपोडे खुर्द हद्दीतील दोस्ती ढाब्याजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पलटी झाला. या अपघातात चालक गणेश खोसे हे जागीच ठार झाले तर सुधार गिरे हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी जखमी गिरे यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेबाबत सुधाकर गिरे यांनी वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.