

सातारा : कराड उत्तरमधील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत बंदिस्त गटर व रस्ता काँक्रिटीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे यांनी दिली.
समाजातील प्रत्येक घटक हा मूळ प्रवाहात आला पाहिजे. सर्व वाड्या वस्ती तांडा वस्तीतील नागरिकांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवण्याच्या संकल्पनेतूनच कराड उत्तरमधील खालील गावांना विकास निधी उपलब्ध झाला आहे. नवीन कवठे येथे उमाजी नाईक नगर येथे रस्ता काँक्रीट करणे 10 लक्ष, बेलवडे हवेली येथे उमाजी नाईक नगर रामोशी वस्ती येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे 15 लक्ष, तळबीड बेलदार वस्ती येथे गटर व रस्ता काँक्रिटीकरण 6 लक्ष, भोसलेवाडी येथे बेघर वस्तीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण 9.50 लक्ष, डिचोली येथे जगदंबनगर कडे येणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण 10 लक्ष, हजारमाची येथील सदाशिव कॉलनीमध्ये रस्ता काँक्रिट करणे 9.51 लक्ष,
रिसवड येथे धनगर वस्तीमध्ये रस्ता काँक्रीट करणे 10 लक्ष, वडोली भीकेश्वर येथे रामोशी वस्तीमध्ये रस्ता काँक्रिट करणे 10 लक्ष, करवडी येथे नंदीवाले वस्तीमध्ये रस्ता काँक्रीट करणे 10 लक्ष, इंदोली येथे नंदीवाले वस्ती येथे रस्ता काँक्रिट करणे 10 लक्ष या कामामुळे वस्तीतील स्वच्छता सुधारून लोकांचे आरोग्य चांगले होणार असून दळणवळणासाठी सुख सुविधा उपलब्ध होणार आहेत. लवकरच उर्वरित गावातील तंडावस्तीना निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आ. मनोज घोरपडे यांनी दिली. तसेच ज्या गावचे आराखडे झाले नसतील त्या गावचे तांडा वस्तीचे आराखडे बनवून घ्यावेत, असे आवाहन आ. मनोज घोरपडे यांनी केले आहे.