

सातारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन कार्डवर मिळणारे धान्य आणि इतर लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील रास्त भाव दुकानात ई-केवायसी मोहीम राबवण्यात येत आहे. ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांसाठी 31 जुलैपर्यंत ई-केवायसीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळणार नसून त्यांचे रेशन कार्ड निष्क्रिय होणार आहे. जिल्ह्यात 2 लाख 81 हजार 48 कार्डधारकांनी ई-केवायसी न केल्यामुळे त्यांना रेशनधान्यास मुकावे लागणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन कार्डवर धान्य मिळण्यासाठी संबंधित लाभार्थी कार्डधारकांची ई-केवायसी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार ई-केवायसी न केलेल्या रेशन कार्डधारकांना रेशनचा लाभ मिळणार नाही. तसेच त्यांचे रेशन कार्ड हे निष्क्रिय केले जाऊ शकते. ई-केवायसी न झाल्यामुळे एखाद्या लाभार्थ्याला धान्यांपासून वंचित राहावे लागल्यास त्याची जबाबदारी कार्डधारकाची राहणार आहे. तसेच शिधापत्रिकेतील कोणी लाभार्थी हे मयत झाले असतील, काही लाभार्थी लग्न, रोजगार व अन्य कारणांनी स्थलांतरित झाले असल्यास त्यांची ई केवायसी करणे शक्य नाही. त्याप्रमाणे तशी माहिती स्वस्त धान्य दुकानदाराला द्यावी लागणार आहे.
ई-केवायसी करण्यासाठी सरकारमान्य अधिकृत अॅप (चशीर ठरींळेप रिि) याद्वारे मोबाईलमध्ये चशीर ठरींळेप अॅप डाऊनलोड करून ई-केवायसी पूर्ण करून घेऊ शकता किंवा जवळच्या रेशन दुकानावर जाऊन आपले आधारकार्ड आणि रेशन कार्ड दाखवून ई-केवायसी पूर्ण करू शकता. ई-केवायसी करताना लाभार्थ्यांनी आधारकार्ड सोबत ठेवावे. बायोमेट्रिक पद्धत (फिंगरप्रिंट) वापरून ई-केवायसी ऑनलाईन पूर्ण करू शकता. इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.