Nitin Gadkari | फलटण शहरात लवकरच 97 कोटींचे रस्ते; ना. नितीन गडकरींकडून घोषणा

निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात
Nitin Gadkari | फलटण शहरात लवकरच 97 कोटींचे रस्ते; ना. नितीन गडकरींकडून घोषणा
Published on
Updated on

फलटण : फलटण शहरात वन टाईम इम्प्रूव्हमेंट तत्त्वावर 97 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा ना. नितीन गडकरी यांनी केली. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी घोषणा ना. नितीन गडकरी यांनी केली.

दरम्यान, सहा पॅकेजेसमध्ये सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गावर काही नवीन विशेष प्रकल्पांची गुरुवारी ना. गडकरी यांनी घोषणा केली. फलटण शहरातील अरुंद रस्त्याचे व राव रामोसे पुलाचे रुंदीकरण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. तसेच रुंद रस्त्यावरून पालखीच्या वेळेस वारकऱ्यांना मार्गक्रमण सोयीचे होणार आहे. जेजुरी येथे 250 कोटी रुपये तरतुदीसह 2 किमी लांबीचा जेजुरी उड्डाणपूलाची घोषणा ना. गडकरी यांनी केली. या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल व शहरातील अपघाताचे प्रमाण कमी होईल.

याशिवाय नीरा रोडवर 72 मीटर आरओबीची घोषणा करण्यात आली. या आरओबीमुळे खंडित रस्ता जोडला जाईल व सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल. तसेच टेंभूर्णी-पंढरपूर (राष्ट्रीय महामार्ग-561 ए) मध्ये 9.50 किमीच्या पंढरपूर बायपासची घोषणा करण्यात आली. 9.50 किमीच्या या बायपासमुळे (टेंभूर्णी-पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित) शिर्डी-अहिल्यानगर- टेंभूर्णी कडून येणारी वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर - मंगळवेढा मार्गावरून शहराबाहेरून जाईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंढरपूरला पूर्णपणे रिंग रोड उपलब्ध होईल, ज्यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. दोन्ही पालखी मार्ग एकमेकांना मिळतात, त्या तोंडले याठिकाणी 100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह उड्डाणपुलाचीही घोषणा करण्यात आली. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी एअरपोर्ट जंक्शन विकसित करून तेथे फ्लायओव्हर बांधण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news