Nepal Flood: महाबळेश्वरमधील १० महिला सुखरूप

महिला सध्या पोखरा येथील हॉटेलमध्‍ये वास्तव्यास असून, जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात
Nepal Flood
Nepal Flood: महाबळेश्वरमधील १० महिला सुखरूप
Published on
Updated on

महाबळेश्‍वर : नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी गेलेल्या महाबळेश्वरातील १० महिला सुखरूप असल्याची माहिती समोर आली. या महिला सध्या पोखरा येथील हॉटेलमध्‍ये वास्तव्यास असून, जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे.

महापुराच्या घटनेनंतर नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाबळेश्वरातील महिलांबाबत अफवा पसरत होत्या. मात्र, महिलांनी स्वतः व्हिडीओच्या माध्यमातून सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख मेघा चोरगे यांनी सांगितले की, आम्ही १० मैत्रिणी सुखरूप असून, आम्ही असलेल्या पोखरा शहरापासून महापुराचे ठिकाण सुमारे ३०० ते ३५० किलोमीटर अंतरावर आहे. ज्या भागात दुर्घटना घडली, त्या भागात जाण्याचे आमचे नियोजन नव्हते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासह पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा प्रशासनाने आमच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. घटनेनंतर घरातील नातेवाईकांचे काळजीपोटी सतत फोन येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि रात्रभर हॉटेलमध्ये जागून काढावी लागली असल्‍याचे अर्चना जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news