Satara News : नागठाणेत श्रमदानातून वनराई बंधारा

नागठाणे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
Satara News
नागठाणेत श्रमदानातून वनराई बंधारा
Published on: 
Updated on: 

नागठाणे : भीषण दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासह पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्याच्या उद्देशाने नागठाणे ग्रामपंचायतीच्या वतीने वनराई बंधारा उभारण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. नागठाणे येथील महादेव मंदिरालगतच्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मदत होणार आहे.

'पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा' हा संदेश देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सातारा जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे (सर), नागठाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी मनीषा भरते-तारळेकर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, अभय एक्सलंट कला-क्रीडा मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येत श्रमदानातून बंधाऱ्याची उभारणी केली.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग उन्हाळ्यात करता यावा, तसेच भूजलपातळीत वाढ होण्यास मदत व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे महत्त्वाची भूमिका बजावतात. शासनाच्या प्रयत्नांसोबतच ग्रामस्थांनीही जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेतल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य आहे. याच विचारातून नागठाणे ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे (सर), ग्रामपंचायत अधिकारी मनीषा भरते-तारळेकर, ग्रामपंचायत कर्मचारी, मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. लोकसहभागातून राबविण्यात आलेला हा उपक्रम जलसंधारणाबाबत जनजागृती करणारा असून, गावाच्या पाणीप्रश्नावर सामूहिक प्रयत्नांतून उपाय शोधण्याचा सकारात्मक संदेश देणारा ठरला. या उपक्रमात तुषार साळुंखे, सागर साळुंखे, अजित मोहिते, प्रशांत मोहिते, प्रवीण मोहिते, राहुल मोहिते, गणेश साळुंखे, गणेश शेलार आणि मन्सूर मुजावर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, अभय एक्सलंट कला-क्रीडा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news