Municipal Council Election Result 2025: करिष्मा शिवेंद्रराजेंचा; वरचष्मा भाजपचा

नगराध्यक्षपदासह 12 जागा जिंकल्या : शिवसेनेला 5 तर शरद पवार गटाला एक जागा
Municipal Council Election Result 2025
Municipal Council Election Result 2025: करिष्मा शिवेंद्रराजेंचा; वरचष्मा भाजपचा Pudhari Photo
Published on
Updated on

मेढा : अत्यंत लक्षवेधक ठरलेल्या मेढा नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदासह बारा जागा जिंकल्या. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विकासकामांच्या माध्यमातून निर्माण केलेला करिष्मा भाजपला सत्तेपर्यंत घेवून गेला. प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अवघी एक जागा मिळाली. त्यामुळे नगरपंचायतीत आता बारा विरुद्ध पाच असे बलाबल झाले असून भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

प्रचार व जागा वाटपादरम्यान शिवसेनेने जोरदार वातावरण निर्मिती केली. मात्र, भाजपने निकालातून त्यांना चपराक दिली. या निकालाने शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. नगराध्यक्षपद व बहुमत भाजपला मिळाल्यामुळे या नगरपंचायतीत भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे.

यंदा तब्बल नऊ वर्षानंतर मेढा नगरपंचायतीची निवडणूक झाली. नगराध्यक्षपदासह नगरपंचायतीच्या बारा जागांसाठी चुरशीने मतदान झाले होते. त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासात निकाल हाती येऊ लागले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रूपाली वारागडे यांनी मुसंडी मारली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या रेश्मा करंजेकर यांचा 46 मतांनी पराभव केला. त्यांना 1616 मते तर शिवसेनेच्या उमेदवार रेश्मा करंजेकर यांना 1570 मते मिळाली. अपक्ष उमेदवार शुंभागी गोरे यांना 177 मते मिळाली.

नगरसेवकपदाच्या 17 जागांपैकी 11 जागा जिंकून भाजपने नगरपंचायतीवर कब्जा मिळवला आहे. प्रभागनिहाय विजयी झालेले उमेदवार, कंसात त्यांचे पक्ष व मिळालेली मते अनुक्रमे अशी, प्रभाग 1- सुशांत कांबळे (भाजपा, 115), प्रभाग 2 - सुनिता तांबे (भाजपा- 88) प्रभाग 3- पुष्पा मुकणे (भाजपा, 124) प्रभाग 4 अनघा करंजेकर भाजपा - (बिनविरोध) प्रभाग- 5 आनंदी करंजेकर भाजपा- (बिनविरोध), प्रभाग 6 सोनाली पवार (शिवसेना, 54), प्रभाग 7 विकास उर्फ पाडूरंग देशपांडे (भाजपा, 116), प्रभाग 8 प्राजक्ता पार्टे (राष्ट्रवादी शरद पवार गट, 72), प्रभाग 9 श्रीकांत जवळ (शिवसेना, 77), प्रभाग 10 हरिश्चंद्र तिवाटणे (भाजप, 129), प्रभाग11 नितीन मगरे (भाजप, 179), प्रभाग 12 शिवाजी गोरे (भाजप, 140) प्रभाग 13 रणधीर गोरे (शिवसेना, 112), प्रभाग 14 तेजस्वी इगावे, (भाजप, 90), प्रभाग 15 मोनिका जवळ (शिवसेना, 106), प्रभाग 16 शर्वरी गायकवाड (शिवसेना, 108 ), प्रभाग 17 शिवाजीराव देशमुख (भाजप, 181).

मेढा नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागांसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, अपक्ष यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रत्यक्षात निकालात मात्र चित्र वेगळे दिसले. शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा करंजेकर यांना कमी कालावधीत सर्व मतदारापर्यंत पोहचता आले नसल्याने या बाबींचा फटका त्यांना बसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आले. प्रतिस्पर्धी उमेदवार रूपाली वारागडे यांनी केलेले डावपेच यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सभेद्वारे उठवलेले रान भाजप उमेदवारांसाठी फलदायी ठरले. नगरसेवक पदाच्या काही जागांमध्ये अनपेक्षित निकाल लागले. प्रभाग 7 मध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार संदीप जवळ यांना अवघ्या सहा मतानी पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news