

सातारा : अत्यंत लक्षवेधक ठरलेल्या सातारा पालिकेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदासह 41 जागा जिंकल्या. राजेंच्या बालेकिल्ल्यात 9 अपक्षांनी मात्र जोरदार मुसंडी मारत मनोमिलनाला दणका दिला. प्रतिस्पर्धी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे सातारा पालिकेत आता भाजप 40, अपक्ष 9 आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) 1 असे पक्षीय बलाबल झाले आहे. स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते हे विक्रमी 42 हजार मतांनी निवडून आले.
सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षांनी निवडणूक झाल्याने नगराध्यक्षपदासाठी 9 तर नगरसेवकपदाच्या 50 जागांसाठी 169 उमेदवार नशिब आजमावत होते. या निवडणुकीत चुरशीने 58.54 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या तासातच निकाल हाती येऊ लागले.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा पालिकेच्या नगरध्यक्षपदी भाजपच्या अमोल मोहिते यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी सुवर्णा पाटील यांचा 42 हजार 32 मतांनी पराभव केला. त्यांना 57 हजार 587 मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) विरोधी उमेदवार सुवर्णा पाटील यांना 15 हजार 555 मते मिळाली. नगराध्यक्षपदाच्या अन्य उमेदवारांना आपला प्रभाव पाडता आला नाही. त्यांना मिळालेली मते, अशी अभिजीत बिचुकले (अपक्ष)2 हजार 772, शरद काटकर (अपक्ष) 3 हजार 900, सनी काटे (अपक्ष) 753, रवींद्र भणगे (अपक्ष) 579, गणेश भिसे (आरपीआय) 2 हजार 234, सागर भिसे (अपक्ष) 816, सुधीर विसापूरे (अपक्ष) 1 हजार 66 मते मिळाली.
नगरसेवकपदाच्या 50 जागांपैकी 40 जागा जिंकून भाजपने सातारा पालिकेवर कब्जा मिळवला आहे. प्रभागनिहाय विजयी झालेले उमेदवार, कंसात त्यांचे पक्ष व मते अनुक्रमे अशी, प्रभाग क्र. 1 मधील अ मध्ये आशा डगळे (भाजप) 1 हजार 569 मते, तर बमध्ये शंकर किर्दत (अपक्ष) 1 हजार 148 मते मिळाली. प्रभाग क्र. 2 मधील अ मध्ये संकेत साठे (शिवसेना एकनाथ शिंदे गट) 1 हजार 269 मते तर बमध्ये शांता कोळी (भाजप) यांना 1 हजार 689 मते मिळाली. प्रभाग क्र. 3 मधील अ मध्ये गुरुदेव ऊर्फ मयूर कांबळे (अपक्ष) 1 हजार 474 मते तर बमध्ये जयश्री जाधव (अपक्ष) यांना 1 हजार 782 मते मिळाली. प्रभाग क्र. 4 मधील अ मध्ये भारती सोळंकी (भाजप) 1 हजार 164 मते तर ब मध्ये निशांत पाटील (भाजप) यांना 1 हजार 335 मते मिळाली. प्रभाग क्र. 5 मधील अ मध्ये अपर्णा बाचल (भाजप) 1 हजार 859 मते तर ब मध्ये विजय देसाई यांना (भाजप) 2 हजार 518 मते मिळाली.
प्रभाग क्र. 6 मधील अ मध्ये सीमा भोसले (भाजप) यांना 2 हजार 240 मते तर ब मध्ये रविराज किर्दत (अपक्ष) यांना 1 हजार 403 मते मिळाली. प्रभाग क्र. 7 मधील अ मध्ये वनिता शिंदे (भाजप) 1 हजार 803 मते तर ब मध्ये मनोज शेंडे (भाजप) यांना 1 हजार 930 मते मिळाली. प्रभाग क्र. 8 मधील अ मध्ये अर्चना कांबळे (भाजप) 1 हजार 206 मते तर ब मध्ये सुधाकर यादव (भाजप) यांना 1 हजार 48 मते मिळाली. प्रभाग क्र. 9 मधील अ मध्ये शारदा वाघमोडे (भाजप) 1 हजार 777 मते तर ब मध्ये अक्षय जाधव (भाजप) यांना 2 हजार 247 मते मिळाली. प्रभाग क्र. 10 मधील अ मध्ये विमल गोसावी (भाजप) 1 हजार 285 मते तर विश्वतेज बालगुडे (भाजप) यांना 1 हजार 957 मते मिळाली.
प्रभाग क्र. 11 मधील अ मध्ये सुजाता गिरीगोसावी (भाजप) 3 हजार 292 तर ब मध्ये अविनाश कदम यांना 3 हजार 144 मते मिळाली. प्रभाग क्र. 12 मधील अ मध्ये भारती शिंदे (भाजप) 2 हजार 241 मते तर ब मध्ये दिलीप म्हेत्रे (भाजप) बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्र. 13 मधील अ मध्ये सावित्री बडेकर (अपक्ष)1 हजार 874 मते तर विनोद ऊर्फ बाळू खंदारे (भाजप) बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्र. 14 मधील अ मध्ये दिनाज शेख(अपक्ष) 1 हजार 889 मते तर ब मध्ये जयवंत भोसले (भाजप) यांना 2 हजार 104 मते मिळाली.
प्रभाग क्र. 15 मधील अ मध्ये सचिन पाटोळे (भाजप) 1 हजार 874 मते तर ब मध्ये ॲड. मोनिका घोरपडे (भाजप) यांना 2 हजार 256 मते मिळाली. प्रभाग क्र. 16 मधील अ मध्ये ॲड. डी. जी. बनकर (भाजप) यांना 1 हजार 39 मते तर ब मध्ये वैशाली राजेभोसले (भाजप) यांना 1 हजार 422 मते मिळाली. प्रभाग क्र. 17 मधील अ मध्ये फिरोज पठाण (भाजप) यांना 3 हजार 353 मते तर बमध्ये पूनम निकम यांना 3 हजार 208 मते मिळाली. प्रभाग क्र. 18 मधील अ मध्ये अनिता फरांदे (भाजप) यांना 2 हजार 75 मते तर विनोद मोरे (अपक्ष) 1 हजार 911 मते मिळाली. प्रभाग क्र. 19 मधील अ मध्ये सुशांत महाजन (भाजप) यांना 2 हजार 357 मते तर हेमलता भोसले (भाजप) यांना 1 हजार 897 मते मिळाली.
प्रभाग क्र. 20 मधील अ मध्ये प्रशांत आहेरराव (अपक्ष) यांना 1 हजार 745 मते तर आशा पंडित (भाजप) या बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग क्र. 21 मधील अ मध्ये सागर पावसे (अपक्ष) 2 हजार 431 मते तर सुजाता राजेमहाडिक (भाजप) यांना 1 हजार 893 मते मिळाली. प्रभाग क्र. 22 मधील अ मध्ये प्राची शहाणे (भाजप) यांना 1 हजार 794 मते तर ब मध्ये धनंजय जांभळे (भाजप) यांना 2 हजार 118 मते मिळाली. प्रभाग क्र. 23 मधील अ मध्ये अशोक शेडगे (भाजप) यांना 1 हजार 651 मते तर मुक्ता लेवे (भाजप) यांना 1 हजार 686 मते मिळाली. प्रभाग क्र. 24 मधील अ मध्ये ॲड. शुभांगी काटवटे (भाजप) यांना 3 हजार 5 मते तर रवींद्र ढोणे (भाजप) यांना 3 हजार 155 मते मिळाली.
प्रभाग क्र. 25 मधील अ मध्ये सूर्यकांत ऊर्फ राजू गोरे (भाजप) 2 हजार 917 मते तर बमध्ये सिद्धी पवार (भाजप) यांना 1 हजार 440 मते मिळाली. या निवडणुकीत प्रभाग क्र. 17 मधील उमेदवार फिरोज पठाण यांना सर्वाधिक 3 हजार 353 मते मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. नगराध्यक्षपदासाठी 1 हजार 700 तर नगरसेवकपदासाठी 3 हजार 875 मते नोटाला मिळाली. नगरपालिकेच्या या निकालाने साताऱ्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागांसाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्यासह नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रत्यक्षात निकालात मात्र चित्र वेगळे दिसले. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांना क्रॉस व्होटिंग झाले आहे.
प्रभाग क्र. 13 मधील काही केंद्रावर मोहिते यांना पाटील यांच्यापेक्षा मते कमी आहेत. अंतर्गत छुपा विरोधाचाही त्यांना फटका बसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार सुवर्णा पाटील यांनी आखलेले डावपेच काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. नगराध्यपदाचे उमेदवार अमोल मोहिते याांच्या प्रचारासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचंड कष्ट घेतले. प्रत्येक प्रभागात त्यांनी कोपरा सभा घेतल्याने मोहिते यांना फायदा झाला.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचीही साथ मिळाल्याने मोहिते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. अपवाद वगळता मतांच्या बाबतीत मोहिते हे प्रत्येक प्रभागात आघाडीवर राहिले. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आ. शशिकांत शिंदे यांनीही नगराध्यक्षदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांच्यासाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबवली. मित्र पक्षांना घेऊन त्यांनी वातावरण निर्माण केले. त्यामुळे प्रभाग क्र. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 त्याचबरोबर 14, 15, 17, 19 आणि काही प्रमाणात 21 मध्ये सुवर्णा पाटील यांना लक्षणीय मते मिळाली. या निवडणुकीत अपक्षांसह इतर प्रादेशिक पक्षांचेही उमेदवार असल्याने त्याचाही काहीप्रमाणात फटका बसला.