

Shahu Maharaj Satara Sangam Mahuli Visit
सातारा : कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी साताऱ्यातील संगम माहुली येथील महाराणी ताराराणी समाधी स्थळाची आज (दि.१६) सकाळी पाहणी केली.
खासदार शाहू छत्रपती महाराज सातारा दौऱ्यावर होते, आज त्यांनी सकाळी संगम माहूली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधीची पाहणी केली. यावेळी समाधीचे पूजन देखील करण्यात आले. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसोबत महाराणी ताराराणी समाधी स्थळ आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काही सुचना असल्यास सांगा, त्यानुसार आराखड्यात बदल करू, असे खासदार शाहू महाराज यांना यावेळी सांगितले. तर नुसत्या बैठका घेऊन काही उपयोग होणार नाही, योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, असे शाहू महाराज यांनी सांगितले.