Mahesh Shinde : ‘एफआरए‌’च्या अधिकाऱ्यांकडून राज्यात कोट्यवधींचा घोटाळा

आ. शिंदे यांचा आरोप : विधिमंडळात दाखवला पुराव्याचा पेनड्राईव्ह
Mahesh Shinde
Mahesh Shinde
Published on
Updated on

सातारा : उच्च व तंत्रशिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या पैशांवर भलत्याच प्रवृत्तीने डल्ला मारला आहे. काही अपप्रवृत्तींनी यात फार मोठा घोटाळा केला. पालकांकडून दुप्पट शुल्क आकारुन एफआरएच्या (फी रेग्युलेटरी ॲथॉरिटी) अधिकाऱ्यांनी हे पैसे त्यांच्या खात्यात वळवले. कोटीविद्या चॅरिटेबल ट्रस्टने राज्य शासनाचे 120 कोटी रुपये बोगस अकाऊंट काढून वळवले आहेत, असा खळबळजनक आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी विधिमंडळात केला. या घोटाळ्याचे आपल्याकडे पुरावे आहेत, असे म्हणत आ. शिंदे यांनी पुराव्याचा पेनड्राईव्हही यावेळी दाखवला.

आ. शिंदे या प्रकरणावरच भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने उच्च तंत्रशिक्षण विभागाला निधी दिला जातो. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के फी दिली जाते. एससी, बीसीच्या विद्यार्थ्यांसाठी 100 टक्के शुल्क राज्य शासनाकडून दिले जाते. आदिवासी, अल्पसंख्याकांनाही फी दिली जाते. तंत्रशिक्षणाचे 2 हजार कोर्सेस राज्यात शिकवले जातात. त्यामुळेच ही लक्षवेधी महत्त्वाची आहे. प्रत्येक पालक पोटाला चिमटा देऊन मुलांना शिकवतो. कोर्सेसचे शुल्क ठरवण्यासाठी फी रेग्युलेटरी ऑथॅरिटी नेमली आहे. संस्थांनी काटामारी करू नये, हा यामागचा उद्देश आहे. मात्र, मागील 8 ते 10 वर्षांमध्ये संस्थांच्या माध्यमातून नियमबाह्य शुल्क वाढवून दिले गेले. कॅटचे ऑडिट माझ्याजवळ आहे. अत्यंत गंभीर अशा त्रुटी एफआरएच्या कारभारात आढळल्या आहेत.

कर्मचारी डाटा एंट्री ऑपरेटरला 90 हजार रुपये पगार दिला गेला आहे. डाटा एंट्री कर्मचारी लीना जगदाळे यांना 110 टक्के पगारवाढ दिली. किर्ती गुप्ता यांना 116 टक्के पगारवाढ दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना का पगार दिले जातात? केस स्टडीमध्ये लक्षात आले की कोट्यवधी रुपये जातात कुठे?, असा सवाल आ. शिंदे यांनी उपस्थित केला.

एफआयएचे धर्मेंद्र मिश्रा या सदस्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कारभाराबाबत वस्तुस्थिती कळवली आहे. या प्रकरणात 11 केसेस झाल्या असून 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. एफआरएच्या कारभाराची चौकशी करणार आहात का? या कमिटीवर असलेल्या माजी न्यायाधीशांना सगळी माहिती आहे. त्यांना कार्यमुक्त करणार का? एफआरएची चौकशी करणार का? मनी ट्रेल अभ्यासून पालकांकडून शुल्क घेतले, ते पालकांना परत करणार का? अशा प्रश्नांचा भडीमार आ. महेश शिंदे यांनी सभागृहात केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news