

सातारा : भाजपचे नूतन सातारा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांचे शुक्रवारी सातारकरांनी जल्लोषी स्वागत केले. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आ. भोसले हे शुक्रवारी प्रथमच जिल्ह्यात आले. शिरवळपासून ते सातारापर्यंत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जागोजागी फटाके वाजवून व पुष्पहार घालून आ. डॉ. अतुल भोसले यांचे स्वागत केले.
सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर सारोळा पूल येथे आ. अतुल भोसले यांचे जाहीर स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिरवळ, खंडाळा, भुईंज फाटा, पाचवड, आनेवाडी टोल नाका, वाढे फाटा येथे ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. दुपारी सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आ. अतुल भोसले यांचे आगमन झाले.
तिथे स्वागत झाल्यानंतर ते भाजपाच्या जिल्हा कार्यालयास भेट देण्यासाठी गेले. त्यानंतर पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. याठिकाणीही फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. शिवतीर्थ परिसरात असंख्य कार्यकर्ते जमले होते. शिवरायांना अभिवादन केल्यानंतर डॉ. भोसले यांनी पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण, क्रांतिगुरु उस्ताद लहुजी साळवे, राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर डॉ. भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या भेटीला गेले. या ठिकाणी उदयनराजेंनी त्यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, जलमंदिर येथून थेट सातारा शासकीय विश्रामगृहात डॉ. भोसले यांच्या वाहनांचा ताफा गेला. याठिकाणी आ. अतुल भोसले यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, दिलीपराव येळगावकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुनील काटकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वाती पिसाळ, विठ्ठल बलशेटवार, चित्रलेखा माने-कदम, माजी जि.प. सदस्य सागर शिवदास, कराड दक्षिणचे माजी तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे, कविता कचरे, अंजनकुमार घाडगे, हर्षवर्धन मोहिते, संजय पवार, सुनिषा शहा, जयकुमार शिंदे, संतोष कणसे, सुनील शिंदे, धनंजय जांभळे, धनंजय पाटील, रेणू येळगावकर, सचिन गाडगीळ, विजय काटवटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यानंतर आ. डॉ. अतुल भोसले यांचा ताफा कराडकडे रवाना रवाना झाला.