Molestation case: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या आरोपीस वडूज येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्षाची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली
Court
Court Pudhari
Published on
Updated on

दहिवडी : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या आरोपीस वडूज येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्षाची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना माण तालुक्यातील राजवडी येथे घडली होती.

याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी गोरख राजेंद्र जाधव (वय 22, रा. राजवडी, ता. माण, जि. सातारा) याने पीडित अल्पवयीन मुलीचा शाळेत ये-जा करताना सतत पाठलाग करून तिला त्रास दिला होता. तक्रारीनुसार, आरोपीने मोटारसायकलवरून पाठलाग करत ‌‘चल गाडीवर बस, मी तुला सोडतो‌’ असे वारंवार म्हणत तिचा छळ केला. तसेच मोबाईलवर संदेश पाठवूनही त्रास दिल्याने पीडिता मानसिक तणावाखाली गेली होती. अखेर त्रास असह्य झाल्याने तिने विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली.

उपचारादरम्यान तिने दिलेल्या जबाबावरून दि. 17 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर व रघुनाथ खोत यांनी बाजू मांडली. एकूण 8 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. साक्षीदारांचे जबाब, कागदोपत्री व वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीस पोक्सो कायद्यानुसार दोषी ठरवत एक वर्ष सक्त मजुरी, 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news