सातारा : नियोजित विकास आराखड्याविरोधात मेढा बाजारपेठ बंद

सातारा : नियोजित विकास आराखड्याविरोधात मेढा बाजारपेठ बंद
Published on
Updated on

सातारा: पुढारी वृत्तसेवा : मेढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रस्तावित अन्यायकारक विकास आराखडा आणि वाढीव चतुर्थकर आकारणी, शास्तीकर स्थगित न करता रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मेढा ग्रामस्थ, शेतकरी बचाव संघाच्या वतीने मेढा बाजार पेठ बंदची हाक देण्यात आली. त्यास बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के दिवसभर बंद पाळून पाठींबा व्यक्त केला आहे.

अन्यायकारक विकास आराखडयाबाबत बाधीत शेतकरी बांधवांनी नगरपंचायतीकडे आपल्या हरकती नोंदविल्या होत्या. अन्यायकारक करवाढीसोबत विकास आराखडा मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या होते. या प्रकरणावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठक घेवून या प्रकरणाला शासनदरबारी स्थगिती आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबत स्थगिती मिळाल्याचेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, शासनदरबारी तसा कुठलाही पत्रव्यवहार नगरपंचायतीकडे आला नसल्याने नगरपंचायतीने विकास आराखडयाबाबतचे आपले काम सुरूच ठेवले आहे.

बाधीत शेतकऱ्यांनी व्यक्तीगत दाखल केलेल्या हरकतीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी ३० ते ३१ मे आणि सार्वजनिक हरकतीच्या सुनावणीसाठी १ जून तारीख जाहिर करण्यात आली होती. त्याबाबत तशा ७३४ शेतकऱ्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. सार्वजनिक सुनावणीला जाण्यासाठी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर ते नगरपंचायत कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. अन्याय कारक विकास आराखडा आणि अन्यायकारक करवाढ रद्द करा या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news