मसूर : वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश स्थगित

मसूर : वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश स्थगित

मसूर ; पुढारी वृत्तसेवा : वीज वितरण कंपनीकडून रिसवड येथील शेतकर्‍यांच्या आरफळ कॅनॉलवरील वीज कनेक्शन खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांच्या मदतीला धाऊन जात अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर 15 मे पर्यंत विद्युत मोटर सुरू न करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच वीज कनेक्शन खंडित न करण्याचा निर्णय झाला. त्यामुळेच शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आरफळ पाटबंधारे उपविभाग मसूर यांच्या वतीने महावितरण कंपनीला रिसवड गावांमधील शेतकर्‍यांच्या वीज जोडणी खंडित करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. यामुळे संबंधित शेतकर्‍यांना शेतीला पाणी मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात व सागर शिवदास यांच्याशी संपर्क साधून कैफियत मांडली.

यासंदर्भात पाटबंधारे उपविभाग मसूर यांच्या कार्यालयामध्ये अधिकार्‍यांना समक्ष भेटण्याचे ठरले. त्यानुसार या विभागाचे उपअधीक्षक उदय नांगरे यांच्याशी चर्चा करून संबंधित शेतकर्‍यांच्या कैफियती मांडल्या. त्यावेळी संबंधित अधिकारी आणि सर्व शेतकरी यांनी आपआपली बाजू मांडली. या सकारात्मक

चर्चेनंतर विद्युत जोडणी तोडायचे दिलेले आदेश स्थगित करण्यात आले. मात्र प्रशासनाला सहकार्य म्हणून येणार्‍या 15 तारखेपर्यंत शेतकर्‍यांनी आपल्या विद्युत मोटारी चालू करू नयेत, अशी सूचना संबंधित अधिकार्‍यांनी उपस्थित शेतकर्‍यांना केली.

यावेळी सागर शिवदास, जिल्हा नियोजन समिती सदस्य निवासराव थोरात यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष सतीशराव इंगवले, वैभव इंगवले, शिवाजी इंगवले, माजी सरपंच दत्ता माळी, राजाराम इंगवले, सुशांत कांबळे, सोमनाथ झंजे, महेश इंगवले, मिलिंद देशमुख यांच्यासह स्थानिक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news