Satara Fire : रायगाव फाट्यावर पाईप साठ्याला भीषण आग

मोठ्या प्रमाणात फायबर पाईप जळून खाक
Satara Fire : रायगाव फाट्यावर पाईप साठ्याला भीषण आग
Published on
Updated on

लिंब : लिंब (ता. सातारा) येथील ढगेवाडी परिसरातील रायगाव फाटा येथे भारत गॅस पुरवठ्यासाठी ठेवलेल्या एमडीपीई पाईपच्या साठ्याला मंगळवारी अचानक आग लागून मोठा भडका उडाला. या आगीत मोठ्या प्रमाणात फायबर पाईप जळून खाक झाले असून, सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ढगेवाडी परिसरातील कोलदरा शिवारात खासगी कंपनीचे गोडाऊन आहे. येथे गॅस पाईपलाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या पाईपचा साठा ठेवण्यात आला होता. दुपारच्या सुमारास अज्ञात कारणाने 20 ते 22 बंडल पाईपला आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले होते. ही आग पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरूनही स्पष्ट दिसत होती.

आगीच्या जवळच मोबाईल टॉवर असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता होती. मात्र, आग टॉवरपर्यंत पोहोचली नाही आणि अनर्थ टळला. याची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनच्या जवानांनी तत्परतेने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात पाईपसाठा असल्याने वेळीच आग नियंत्रणात आल्यामुळे मोठे नुकसान टळल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. एम. पी. इंजिनिअरिंग (मुंबई) या कंपनीच्या गोदामातील सुमारे 22 एमडीपीई पाइप या आगीत खाक झाले असून, अंदाजे 4 ते 4.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news