

सातारा : विवाहितेचा जाचहाट करुन छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 2010 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत सासरच्या मंडळींनी त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पती अमोल बाळकृष्ण जाधव, सासू विमल बाळकृष्ण जाधव, सासरे बाळकृष्ण श्रीपती जाधव, दीर योगेश बाळकृष्ण जाधव (सर्व रा. शाहूनगर, सातारा) यांच्या विरुध्द सौ. मोहिनी अमोल जाधव (वय 36, रा. खेड ता.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार सौ. मोहिनी जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सासरच्या मंडळींनी माहेरहून 3 लाख रुपये घेवून ये. स्त्री धन जबरदस्तीने विकायला लावणे, असे करुन सासरच्या मंडळींनी शारीरीक, मानसिक त्रास देवून छळ केला. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास तुम्हा दोघींचे बरे, वाईट करु अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.