Marriage Fraud: लग्नाच्या आमिषाने पुरुषाला लाखोंचा गंडा; तिघांवर गुन्हा

एका व्यक्तीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिने असे मिळून 2 लाख 55 हजार 543 रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला
marriage fraud case
Marriage Fraud CasePudhari Photo
Published on
Updated on

कराड : एका व्यक्तीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिने असे मिळून 2 लाख 55 हजार 543 रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोन महिलांसह तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत पांडुरंग निकम, रा. मराठानगर, ता. खटाव, जि. सातारा यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. यावरून शोभा महादेव चव्हाण (रा. पाटीलवाडी, म्हासोळी, ता. कराड), महादेव जयसिंग देसाई (रा. आरेवाडी, ता. कराड) व आशाताई शिवाजी पाटील (रा. म्हासोली, ता. कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत निकम यांना संशयित आरोपी शोभा चव्हाण हिने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिने घेतले. यामध्ये महादेव देसाई व आशाताई पाटील यांचाही सहभाग आहे.

यानंतर संशयित आरोपींनी वेळोवेळी पैशांची गरज असल्याचे सांगत एकूण 1 लाख 90 हजार रुपये रोख रक्कम घेतली. तसेच सुमारे 65 हजार 543 रुपयांचे सोन्याचे दागिनेही घेतले. यामध्ये दोन जोड्या बांगड्या, एक जोड टॉप्स, दोन वेल आणि मंगळसूत्राचा समावेश आहे. एकूण 2 लाख 55 हजार 543 रुपयांचा ऐवज फिर्यादी भरत निकम यांच्याकडून घेतला. जानेवारी 2020 पासून हा प्रकार सुरू होता. मात्र, ठरल्याप्रमाणे लग्न न करता संशयित आरोपी शोभा चव्हाण हिने टाळाटाळ सुरू केली. तसेच घेतलेली रक्कम व दागिने परत देण्यास नकार दिल्याने फिर्यादीची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर फिर्यादीने याबाबत पोलिसांत तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news