

कराड : ओगलेवाडी, ता. कराड येथे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी घेतलेल्या जनता दरबाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबारात 583 नागरिकांनी आपापल्या विविध विभागांतील समस्या आ. मनोज घोरपडे व प्रशासकीय अधिकार्यांसमोर मांडल्या. आ. मनोज घोरपडे यांनी 300 हून अधिक तक्रारींचा जागेवर निपटारा केला.
कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी ओगलेवाडी, ता. कराड येथे जनता दरबार घेतला. या जनता दरबारात मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आपली गार्हाणी मांडली. त्यांच्या तक्रारींचा आ. मनोजदादा घोरपडे यांनी प्रशासनाला सूचना करुन जागेवर निपटारा केला. यावेळी महसूल, भूमी अभिलेख, प्रांत विभाग, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, एमएससीबी, मदत व पुनर्वसन, पोलीस अधिकारी, ग्रामविकास, जलसंपदा, आरोग्य, एकात्मिक बालविकास, वनविभाग, शालेय शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पशुसंवर्धन, फेरफार, अदालत व कोषागार विभाग यासारख्या 22 शासकीय विभागामधील समस्या सोडवण्यात आल्या.
दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार मनोज दादा घोरपडे, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे, कृषी अधिकारी, नायब तहसीलदार राठोड उपनिबंधक यादव यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिधा पत्रिका वाटप करण्यात आले. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंढे अपघात
विमाच्या पात्र लाभार्थ्यांना 2 लाख रुपये मंजुरी पत्र देण्यात आले. यावेळी बापूराव धोकटे, विजय कदम, नवनाथ पाटील, प्रकाश पवार, यशवंत डुबल, निलेश डुबल, संभाजी पिसाळ, विनायक भोसले, अमोल पवार, शिवाजी डुबल उपस्थित होते.