Theft News: स्वत:च्याच घरी केली चोरी; 6 लाखांचा ऐवज लंपास

आई-वडील राहत असलेल्या स्वत:च्या घरात मुलाने मित्रासोबत केली घरफोडी
Satara Theft News |
Theft News: स्वत:च्याच घरी केली चोरी; 6 लाखांचा ऐवज लंपासFile Photo
Published on
Updated on

सातारा : बेबलेवाडी, ता. सातारा येथे मार्च 2025 मध्ये आई-वडील राहत असलेल्या स्वत:च्या घरात मुलाने मित्रासोबत घरफोडी केली. घरातून तब्बल 6 लाख रुपये किमतीचे 8 तोळे सोने लंपास केले. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

अक्षय विलास मोरे (वय 25) याच्या विरुद्ध आई हेमा विलास मोरे (वय 52, रा. बेबलेवाडी, पो.नुने) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, चोरीची मूळ घटना मार्च 2025 मध्ये घडली आहे. चोरट्यांनी घरातून 5 लाखांचे 5 तोळ्यांचे सोन्याचे गंठण, 40 हजारांची 12 ग्रॅम वजनाची मोहनमाळ, 72 हजार रुपये किंमतीचे 4 ग्रॅमची अंगठी तसेच टॉप्स, सोन्याच्या रिंगा असे 13 ग्रॅमचा ऐवज चोरी केला. या घटनेनंतर तक्रारदार यांचा मुलगा बेपत्ता होता. चोरीची घटना समोर आल्यानंतर आईने मुलाच्या नावासह पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. अक्षय याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. तसेच ही चोरी मित्रासोबत केली असल्याचेही सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अक्षय याला अटक केली व त्याच्या साथीदाराचा शोध सुरु केला आहे. चोरीचे सोने कुठ ठेवले आहे? विकले आहे? याचा पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news