Atul Bhosale: मलकापूर ही टीडीआर देणारी राज्यातील पहिली नगरपरिषद

आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांची माहिती; मलकापूर शहराला फाइवस्टार मॉडर्न बनवणार
Atul Bhosale: मलकापूर ही टीडीआर देणारी राज्यातील पहिली नगरपरिषद
Atul Bhosale: मलकापूर ही टीडीआर देणारी राज्यातील पहिली नगरपरिषदPudhari
Published on
Updated on

कराड : मलकापूर शहराचा संपूर्ण देशात अत्यंत चांगला नावलौकिक आहे. ‌’क‌’ वर्ग नगरपरिषदांमध्ये टीडीआर देणारी राज्यातील मलकापूर ही पहिली नगरपरिषद आहे. शहराचा होत असलेला विकास व वाढत असलेली लोकसंख्या याचा विचार करता भविष्यात शहराला फाइव स्टार मॉडर्न शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

मलकापूर नगरपरिषदेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, यांच्यासह सभापती हणमंतराव जाधव, सुरज शेवाळे, धनंजय येडगे, गीतांजली पाटील, नगरसेवक प्रमोद शिंदे, नितीन काशिद, दादासाहेब शिंगण मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते टीडीआर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, शहराचा विकास होत असताना अपुऱ्या जागेवरती टीडीआरच्या आधारावर मोठमोठ्या इमारती उभा करता येऊ शकतात. त्यामुळे शहराच्या विकासासाठी टीडीआर प्रदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टीडीआर मिळाल्यानंतर आरक्षण पडलेल्या जागा मालकाला (उदाहरणार्थ) दहा गुंठ्याच्या बदल्यात 20 गुंठे टीडीआर मिळू शकतो. त्यामुळे शहराचा विकास गतीने केला जाऊ शकतो. शहराचा विकास करत असताना आरक्षणामध्ये जमीन गेली असली तरी जागा मालकाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. संबंधित जागा मालकाला टीडीआरच्या माध्यमातून चांगला मोबदला मिळू शकतो. कराड विमानतळामुळे केवळ सात मजल्यापर्यंत इमारतींना परवानगी दिली जाऊ शकते, याचा विचार मलकापूर नगरपरिषदेने केला पाहिजे.

सरकारकडून मलकापूरसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुढील तीन महिन्यात मलकापूर नगरपरिषदेची इमारत पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. ‌’क‌’ वर्ग नगरपरिषदांमध्ये राज्यातील सगळ्यात मोठी इमारत मलकापूरची असणार आहे. त्यामुळे या इमारतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही इमारत पूर्ण करत असताना इमारतीच्या बाजूलाच लॉन, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागा तसेच नगरपालिका व नागरिकांमध्ये सुसंवाद रहावा म्हणून संपर्क वाढवला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news