Kasturi Club Makar Sankranti celebration: कस्तुरींसाठी रंगणार मकर संक्रांत सोहळा

दै. ‌‘पुढारी‌’ कस्तुरी क्लब व पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्यातर्फे आयोजन
Pudhari Kasturi Club |
Pudhari Kasturi ClubPudhari File photo
Published on
Updated on

सातारा : दै. ‌‘पुढारी‌’ कस्तुरी क्लब व पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्यातर्फे शुक्रवार दि.30 जानेवारी रोजी दु. 2 ते 5 या कालावधीत कला व वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदान येथे मकर संक्रांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी डान्स, गंमतीशीर खेळ व हळदी-कुंकू समारंभातून वाण लुटले जाणार आहे. तसेच होम मिनीस्टरमधून मानाची पैठणी, लकी ड्रॉद्वारे भरपूर बक्षीसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

या सोहळ्यामध्ये महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देवून थोडेसे मनोरंज व्हावे, यासाठी विविध फनी गेम्स घेवून विजेत्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. मकर संक्रांत सोहळ्याचे मुख्य प्रायोजक पु. ना. गाडगीळ आणि सन्स हे आहेत. स्वागत कलेक्शन्सकडून होम मिनीस्टर विजेत्यांना पैठणी दिली जाणार आहे. तसेच सहभागी सर्व महिलांना श्वेता फॉर्मिंग ज्वेलरीचे विजय कदम यांच्याकडून वाण व फनी गेम्सच्या विजेत्यांना बक्षीसे दिली जाणार आहेत.

कस्तुरींनी काळ्या रंगाच्या साड्या परिधान करुन साजशृंगारासह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 9172840739 वर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन दै. ‌‘पुढारी‌’ कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news