

वडूज : येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर जय मल्हार अकॅडमीच्या वतीने पोलिस भरतीच्या महाडेमोचे आयोजन करण्यात आले होते. या महाडेमो भरतीमध्ये सुमारे साडेआठशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी 100 मीटर, आठशे मीटर, 1600 मीटर धावणे, गोळाफेक आदि क्रीडा प्रकारासह लेखी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये मुलांच्या गटात तेजस गायकवाड 141 गुण, समाधान पवार 141 गुण या दोघांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. सागर मार्कड याने 140 गुण मिळवून द्वितीय, विशाल कुपकर, अल्ताफ शेख, अक्षय भाग्यवंत यांनी 139 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात आहिल्या चोपडे हिने 142 गुण मिळवून प्रथम, प्रणाली गायकवाड 136 द्वितीय तर स्नेहल भोसले हिने 135 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
‘जयमल्हार’चे संस्थापक नगरसेवक बनाजी पाटोळे यांनी स्वागत केले. नगरसेवक सचिन माळी, सोमनाथ जाधव, ओमकार चव्हाण, राजेंद्र कुंभार, सागर जाधव, ॲड. विनोद शिंदे, आशिष दोशी, माजी सरपंच राजेंद्र फडतरे, मंगेश पाटोळे, सौरभ जाधव आदींसह मान्यवरांनी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले.