Mahabaleshwar weather: ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर गारठले

दाट धुक्यामुळे पर्यटकांना भरतेय हुडहुडी
Mahabaleshwar weather
Mahabaleshwar weatherPudhari
Published on
Updated on

महाबळेश्वर : राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असताना थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे मात्र वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. पर्यटक व स्थानिकांना एप्रिल महिन्यातही थंडीचा अनुभव येत आहे. रोज सकाळी 6 च्या सुमारास शहराचा पारा 10 अंशांवर येत आहे, तर सायंकाळी तापमान 15 ते 16 अंशांपर्यंत खाली येत आहे. सकाळी व सायंकाळी पडणारे दाट धुके गारठून टाकत आहे. त्यामुळे पर्यटकांना ऐन उन्हाळ्यात थंडावा मिळत आहे.

उन्हाळा सुरू झाल्यामुळे बहुतांश जिल्ह्यांचे तापमान हे 35 अंशांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, महाबळेश्वरमध्ये वातावरणात बदल झाल्याने ऐन उन्हाळ्यातच हिवाळ्याचा फिल येत आहे. दिवसभर किंचित उष्णता जाणवत असली, तरी पहाटे व सायंकाळी थंड वाऱ्यासह कडाक्याची थंडी जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत बदलत्या हवामानामुळे प्रसिद्ध वेण्णा लेक परिसर धुक्याच्या चादरीत हरवलेला दिसत आहे. या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत.

स्वेटर, कानटोपी घालून पर्यटकांचा फेरफटका

सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. विशेषतः शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असून, थंड हवामानाचा आनंद लुटत आहेत. सायंकाळच्या वेळी पर्यटक स्वेटर, कानटोपी परिधान करून मुख्य बाजारपेठेत फिरताना दिसत असून, एप्रिल महिन्यातही हिवाळ्याचा आनंद घेण्याची अनोखी संधी महाबळेश्वर देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news