Satara Accident : क्षेत्र म‌’श्वरच्या नवीन रस्त्यावर अपघात

पर्यटक जखमी : तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
Satara Accident
क्षेत्र म‌’श्वरच्या नवीन रस्त्यावर अपघात
Published on
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथून श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रविवारी रात्री पर्यटकाच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात वाहनाचेे नुकसान झाले असून सुदैवाने पर्यटक किरकोळ जखमी होऊन बचावले. संबंधित पर्यटक वाई येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

महाबळेश्वर पर्यटनस्थळी रस्त्यांची अवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पालिकेच्या अखत्यारीतील केट्स पॉईंट ते क्षेत्र महाबळेश्वर जोडणारा डचेस रस्ता तसेच महाबळेश्वर शहर ते क्षेत्र महाबळेश्वर मुख्य रस्ता यांची पूर्वी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती होती. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. राज्य शासनाच्या नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर निधीतून सुमारे दीड वर्षांपूर्वी हॉटेल उदयपासून क्षेत्र महाबळेश्वर कर नाक्यापर्यंत अंदाजे साडेचार किलोमीटर अंतरावर काँक्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. त्यापैकी सुमारे तीन किलोमीटरचे काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी मोऱ्यांची कामे वर्षभरापासून प्रलंबित आहेत.

नवीन रस्त्यावर काही धोकादायक ठिकाणी उपाययोजना झालेल्या नाहीत. रविवारी रात्री क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावरील सबा गार्डन परिसरात एक वाहन रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात कोसळले. यामध्ये पर्यटक जखमी झाले. श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरासह प्रमुख पर्यटनस्थळे याच मार्गावर असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. विशेषतः पावसाळ्यात अपघातांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करून तातडीने संरक्षक कठडे, फलक, प्रकाशयोजना व इतर सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.सध्या वेण्णालेक मागील बाजूस असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असून उन्हाळी हंगामापूर्वी प्रलंबित मोऱ्यांची कामे आणि संरक्षक उपाययोजना पूर्ण करण्याची मागणीही होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news