Shivendraraje Bhosale | महाबळेश्‍वर-शिरूर मार्गाचा पहिला टप्पा वर्षात पूर्ण करणार : विधानपरिषदेत ना. शिवेंद्रराजेंची माहिती

'बांधकाम'कडील थकीत देयकेही देणार
Shivendraraje Bhosale
Shivendraraje bhosalePudhari Photo
Published on
Updated on

सातारा : महाबळेश्‍वर-पोलादपूर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. महाबळेश्वर-शिरूर या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे निम्मे काम झाले आहे. हा टप्पा वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वर्षात पुण्यातील ३९८ कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाकडे ठेकेदारांची १७ हजार ५६२ कोटी इतकी थकीत देयके आहेत. या देयकांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. ही थकीत देयके देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

विधानपरिषदेत आ. प्रवीण दरेकर यांनी महाबळेश्‍वर-पोलादपूरमार्गे दापोली मार्ग व्‍हावा. या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, संबंधित मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्वीच हाती घेतले आहे. पोलादपूर-महाबळेश्‍वर-वाई-शिरूर या मार्गाचे दोन टप्प्यांत रुंदीकरण व सुधारणा करण्याचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. 'हॅम' मधील असलेल्या या कामाचा पहिला टप्पा महाबळेश्वर-शिरूर असा २४ कि.मी.चा आहे. १३८.५३ कोटींचे हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संरक्षक कठडे, क्रॅश बॅरियर्स आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही ना. शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.

ठेकेदारांच्या थकीत देयकाबाबत माहिती देताना ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १७ हजार ५६२ कोटींची थकीत देयके आहेत. स्पिलचा आकडा धरून थकीत असल्याचे समजले जाते. २०२४ मध्ये ८९ हजार ६६८ कोटी असलेला स्पिल सध्या ५३ हजार ९९ कोटींपर्यत कमी झाला आहे. थकबाकीबाबत जे सांगितले जाते तशी वस्तुस्थिती नाही. थकीत देयकांसाठी अर्थसंकल्पात त्यासाठी १८ हजार ९५० कोटींची तरतूद केली आहे.

आ. निलम गोर्‍हेंनी उपस्‍थित केलेल्‍या समृद्धी महामार्गाबाबत केलेल्‍या प्रश्‍नावर उत्तर देताना ना. शिवेंद्रराजे म्‍हणाले, या रस्त्यालगत जनसुविधा केंद्र उभारण्याच्‍या सूचना केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने २०० कि.मी.चे दर्जेदार मार्ग ८० दिवसांत पूर्ण केल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news