

भिलार : महाबळेश्वरहून-पाचगणीकडे जाणार्या मुख्य मार्गावरून पांगारी फाट्यावरून गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर बिबट्या आढळून आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
पांगारी रस्त्यावर गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर महेंद्र पांगारे हे चार चाकी गाडीतून जात होते. अचानक त्यांना शेजारच्या झुडुपातून बिबट्या बाहेर आल्याचे दिसले. बिबट्या दिसताच गाडीतील सर्वांचीच गाळण उडाली. गाड्यांचा आवाज येताच बिबट्या जंगलाच्या बाजूने निघून गेला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बिबट्याचा डोंगर परिसरात वावर असून वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले ओह.
सध्या नवरात्रौत्सव चालू असून गावचे जननी माता मंदिर हे गावच्या वरच्या बाजूस झाडीत असल्याने महिला मुले व नागरिक दररोज सायंकाळी येत असतात. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.