Mahabaleshwar excavation case : उत्खननप्रकरणी पालिकेवर गुन्हा

सलग तिसरा गुन्हा; पालिका-वन विभाग समन्वयावर प्रश्नचिन्ह
Mahabaleshwar excavation case
Mahabaleshwar excavation casePudhari
Published on
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिका हद्दीतील आर. आर. हेरिटेज रिसॉर्ट ते लॉडविक पॉईंट या पर्यायी रस्त्याच्या कामादरम्यान वनक्षेत्रात अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी महाबळेश्वर नगरपरिषदेविरुद्ध भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर संबंधित रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे. यामुळे वन विभाग व पालिकेत समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

वन विभागाच्या पाहणीत वनक्षेत्रातील रस्त्यावर सुमारे 150 मीटर लांब, दोन मीटर रुंद व दीड मीटर खोल खोदकाम झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी पालिकेवर दाखल झालेला हा सलग तिसरा वनगुन्हा ठरला आहे. यापूर्वी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी वनक्षेत्रात गेल्याप्रकरणी तसेच कचरा डेपोतील कचरा वनक्षेत्रात आढळल्याप्रकरणीही पालिकेविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. पालिकेच्या वतीने श्री क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आर. आर. हेरिटेज रिसॉर्ट ते लॉडविक पॉईंटपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ठेका देण्यात आला होता. काम सुरू असताना वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे व वनरक्षक लहू राऊत यांनी केलेल्या पाहणीदरम्यान हे उत्खनन निदर्शनास आणले.

या प्रकरणी पालिकेचे अभियंता प्रदीप बोरगे यांना पत्र देत कामासाठी वापरलेले जेसीबी व ट्रॅक्टर कार्यालयात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, प्रक्रियेत सहकार्य न झाल्याने वन विभागाने पालिकेला नोटीस बजावत पुढील कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news