Mahabaleshwar tourism: नाताळमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले

थंडीमुळे हुडहुडी : पुढील दहा दिवस जत्रेचे स्वरूप
Mahabaleshwar tourism
Mahabaleshwar tourism: नाताळमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले Pudhari
Published on
Updated on

महाबळेश्वर : नाताळ सुट्ट्यांमुळे गुलाबी थंडीसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले आहे. महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही निसर्गरम्य पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल होवू लागली आहेत. देश विदेशातील पर्यटक येथील गुलाबी थंडीचा नखरा अनुभवत वेण्णालेकवर नौकाविहार करत आहेत. सायंकाळी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असून नाताळ व नववर्षानिमित्त सर्वच हॉटेल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातूनच नव्हे तर विविध राज्यामधून लाखो पर्यटक महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देत असतात. नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक या नयनरम्य ठिकाणी दाखल होत आहेत. महाबळेश्वरनगरी पर्यटकांच्या आगमनाने फुलून गेले आहे. ‌‘मेरी ख्रिसमस...‌’ म्हणत नाताळच्या प्रमुख हंगामासाठी महाबळेश्वर सज्ज आहे. दिवाळी हंगामानंतर आता प्रमुख हंगाम म्हणून नाताळ हंगाम ओळखला जातो.

नाताळसह नववर्ष स्वागतासाठी या थंड हवेच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल होत असते. यंदाही नाताळनिमित्त कुठे आकर्षक फुलांची सजावट तर कुठे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अनेक रिसॉर्टसवर नाताळ व नववर्षाचे औचित्य साधत विविध थीम्स, विविध गेम्सची धूम आहे. तसेच येथील जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्वधर्मीय बांधव भेट देत आहेत. महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षण असलेल्या वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वेण्णालेकसह विविध पॉईंटस्‌‍वर वर्दळ वाढली आहे.

तापमानाचा पारा घसरल्याने थंडीने पर्यटकांना हुडहुडी भरली आहे. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत सायंकाळी स्वेटर, मफलर, कानटोपी परिधान करून पर्यटक फेरफटका मारत आहेत. थंड वातावरणात अनेक खवय्ये पर्यटक हे स्ट्रॉबेरी विथ क्रिम, आईसगोळा अशा थंड पदार्थांसोबत गरमागरम मका पॅटिस स्प्रिंग पोटॅटो, शोर्मासारख्या पदार्थांवर देखील तुटून पडत आहेत. पर्यटक सध्या हात-गाड्यांपासून मोठं मोठ्या रेस्टॉरंटवर दिसत आहेत. लाल चुटुक, आंबट गोड स्ट्रॉबेरीची चवही पर्यटक घेत आहेत. गाजर, मुळा, गरमागरम मका कणसावरही ताव मारत मारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news