Satara : जिल्हा रुग्णालयात वाढली चमकोगिरी

चिरीमिरीला मिळतेय खतपाणी; समाजसेवा करण्याच्या नावाखाली लूट
Satara News
जिल्हा रुग्णालयात वाढली चमकोगिरी
Published on
Updated on

विशाल गुजर

सातारा : गोरगरिबांचे आरोग्य मंदिर असलेले जिल्हा रुग्णालयात उपचाराऐवजी आता पैसे कमवण्याचे केंद्र बनू लागले आहे. काही चमकोंनी रुग्णालयात उच्छाद मांडला असून रुग्ण, डॉक्टर व कर्मचार्‍यांचीही पिळवणूक होवू लागली आहे. समाजसेवा करण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा जोमात सुरु असून जिल्हा रुग्णालयामधीलही काही जणांचे चिरीमिरीसाठी खतपाणी मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

वैद्यकीय उपचार हे सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांना न परवडणारी बाब आहे. यामुळे गोरगरीब उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये जातात. वास्तविक सिव्हील प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून कात टाकल्याने उपचार, स्वच्छता यामध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. याचा फायदा गोरगरीब जनतेला होत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला मिळाल्यानंतर ते गांगरून जातात. यामुळे गावपातळीवर ते स्थानिक नेत्याला साकडे घालतात. तेथून काही डाळ शिजत नसली की जिल्हा रुग्णालयामधील काम करुन देतो असे सांगून काही जणांनी दुकानदारी मांडली आहे. अशा अपप्रवृत्तीच्या जाळ्यात रुग्ण, नातेवाईक सापडत आहेत. या सर्व प्रक्रियेत हाल, पैसा, वेळ वाया जात आहे.

जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येक कामासाठी ठरलेली प्रक्रिया पार पाडल्यानंतर बहुतेकदा अडचण येत नाही. मात्र, मध्यस्थी करणार्‍यांकडून आव्वाच्या सव्वा कारणे सांगून स्वतःचे महत्व वाढवले जात आहे. यातूनच जिल्हा रुग्णालयाला बदनाम करण्याचा उद्योग केला जात आहे. अनेकदा किरकोळ कामासाठी वजनदार लोकांचे नाव सांगून टोळी आपले इप्सित साध्य करत आहे. अनेकदा वजनदार नेत्याला त्याचा मागमूसही माहित नसतो. मात्र, अशा पंटरांना जिल्हा रुग्णालयाचे प्रशासनही दबकते व गरीब रुग्णांना तात्काळ सेवा मिळण्यास विलंब होतो. नियमांची पायमल्ली होते व अनागोंदी त्यातूनच वाढते. आपला खिसा गरम करण्याचे धंदे हे चमको करत असून त्यांचा जिल्हा रुग्णालयात सुळसुळाट सुरु आहे. काही बहाद्दर थेट आपण या संघटनेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आहे, संघटक आहे असे सांगून जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा वेठीस धरत आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून अशांची अनेकदा खातरजमा केली जात नाही. त्यातूनच अशांची दुकानदारी सुरु होते. जिल्हा रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते.

जिल्हा रुग्णालया प्रशासनामधील काही जणांचाही अशा भानगडीसाठी सक्रीय सहभाग असतो. सर्वसामान्य 100 किलोमीटर अंतरावरुन आलेला असतो. जिल्हा रुग्णालयामधील नेमकी माहिती मिळत नसल्याने ते वरिष्ठांना भेटण्याचा प्रयत्न करतात. याचबरोबर माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढून व विविध गैरसोयी असल्याचा बहाणा करणार्‍यांचा काही जणांनी सेटलमेंटचा नवा धंदा सुरु केला आहे. त्याला आळा बसवण्यासाठी जिल्हा रुग्णालया प्रशासनाने पुढे आले पाहिजे.

सिव्हिल सर्जननी लक्ष द्यावे...

जिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल बिल, विविध प्रस्ताव, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना यासह इतर कामासाठी सर्वसामान्यांपासून अनेक मातब्बर येत असतात. यांची कामे कमिशन घेऊन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय परिसरात काही महाठक कार्यरत आहेत. संबंधित टेबलसह जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हिश्शाचे पैसे घेत आहेत. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी याकडे लक्ष देऊन प्रशासनाला बदनाम करणार्‍यांना हद्दपार करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news