

Satara Kas Road leopard
सातारा: कास रोडवर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रस्त्यावरून बिबट्या फिरताना पर्यटकांना दिसत आहे. त्यामुळे सातारा - कास रोडवर फिरताना पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या कास पुष्प पठाराचा हंगाम चालू असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक कास पठाराशेजारील भागात मुक्कामी पर्यटनासाठी येत आहेत, अशातच रात्री देखील पर्यटक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी कास रोडवर फेरफटका मारत आहेत, अशातच बिबट्या रस्त्यावर दिसू लागल्याने वाहनधारकांसह पर्यटकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. वेळीच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह पर्यटकांकडून केली जात आहे.