Leopard attack: मतदानाच्या पूर्वसंध्येला अधिराज उंडाळकरांवर बिबट्याचा हल्ला

उंडाळे - शेवाळेवाडी मार्गावरील घटना, दुचाकीवरून प्रवास करताना थोडक्यात बचावले
Leopard attack
leopard attack: मतदानाच्या पूर्वसंध्येला अधिराज उंडाळकरांवर बिबट्याचा हल्लाPudhari
Published on
Updated on

उंडाळे : जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता माजी सहकारमंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नातू अधिराज पाटील यांच्यासह दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने दुचाकीवरील दोघेही बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले असले तरी अधिराज पाटील यांच्या पायाला पंजा लागल्याने दुखापत झाली आहे. या घटनेमुळे उंडाळेसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिराज पाटील यांचे वडील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहेत. निवडणूक प्रचाराची सांगता झाल्यानंतर शुक्रवारी रात्री अधिराज पाटील हे धनाजी पाटील हे चालवित असलेल्या दुचाकीवरून उंडाळे - शेवाळेवाडी मार्गाने प्रवास करत होते. दुचाकी उंडाळे हद्दीत आल्यानंतर अचानकपणे बिबट्याचे पिल्लू आणि मादी बिबट्या रस्त्यावर आला आणि त्याने दुचाकी झडप घालण्याचा प्रयत्न केला. यात दुचाकी चालक धनाजी पाटील यांनाही पंजा लागला आहे.

याशिवाय अधिराज पाटील यांच्या पायाला पंजा लागून दुखापत झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या धक्कादायक घटनेनंतर उंडाळेसह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जखमी आधिराज पाटील व धनाजी पाटील यांच्यावर उंडाळे प्राथमिक रूग्णालय येथे उपचार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news