Gulmohar Tree: गुलमोहराकडून शिकावं, उशीर झाला तरी असं फुलावं

उशिरा का होईना, पण मनसोक्त फुलण्याचा संदेश जागोजागी अंगोपांगी बहरलेला गुलमोहर देत आहे
Gulmohar tree
Gulmohar treePudhari
Published on
Updated on

मोहोळ : 'गुलमोहराकडून शिकावं, उशीर झाला तरी हरकत नाही; पण बहरताना असं मनसोक्त फुलाव' या ओळींची प्रचिती सध्या सर्वत्र येत आहे. उशिरा का होईना, पण मनसोक्त फुलण्याचा संदेश जागोजागी अंगोपांगी बहरलेला गुलमोहर देत आहे.

उन्हाळ्याच्या कडक झळांमध्ये लाल, केशरी आणि पिवळ्या रंगांच्या आकर्षक फुलांनी बहरलेला गुलमोहर ठिकठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गावातील रस्ते, शहरातील चौक, महामार्गांच्या कडेला, शेतांच्या बांधावर तसेच माळरानावरही गुलमोहराची झाडे डौलाने फुलली आहेत. रखरखीत वातावरणात या फुलांचा बहर डोळ्यांना सुखावणारा ठरत असून निसर्गप्रेमींना आनंदाची अनुभूती देत आहे.

विशेष म्हणजे वर्षभर साध्यासुध्या दिसणाऱ्या या झाडांकडे अनेकांचे लक्ष जात नाही. मात्र योग्य वेळ येताच गुलमोहर फुलांनी अक्षरशः नटून जातो आणि प्रत्येकाला जगण्याचा एक सुंदर संदेश देतो. आयुष्यात यश मिळण्यास उशीर झाला तरी खचून न जाता योग्य संधीची वाट पाहत राहावे आणि वेळ आल्यावर आपल्या कर्तृत्वाचा बहर दाखवावा, हेच जणू गुलमोहर शिकवत आहे. शीतल गारवा, तृप्तता व आयुष्याला उभारी देणारा गुलमोहोर. काही निसर्गात घडणाऱ्या मोहक गोष्टी, खूप काही सुखाचे क्षण आपल्या ओंजळीत सहजपणे टाकतात. गुलमोहोर हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये ‘मे फ्लॉवर ट्री’ म्हणून संबोधले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news