Land fraud case: जमीन व्यवहारातून सव्वा कोटीची फसवणूक; दोघांना अटक

जमीन खरेदीचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 31 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोरेगाव शहरात उघडकीस आला
Land Scam
Land ScamPudhari
Published on
Updated on

कोरेगाव : जमीन खरेदीचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 31 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोरेगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद यशवंत बर्गे (वय 45, रा. शिवाजीनगर, कोरेगाव) यांना आरोपी राजेश महादेव शेकटकर (रा. बावधन, पुणे) आणि गोपाल वेलियाविटील (रा. सातारा) यांनी संगनमत करून जमीन विक्रीचे आमिष दाखवले. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील गट क्रमांक 549/2 मधील सुमारे 5 एकर 2 गुंठे जमीन विक्रीस देण्याचे आश्वासन देत आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला.

सदर जमिनीवरील डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पैसे लागतील, असे सांगत एप्रिल 2024 पासून टप्प्याटप्प्याने 1 कोटी 31 लाखांहून अधिक रक्कम उकळण्यात आली. मात्र, कर्ज फेडल्यानंतरही जमीन फिर्यादींच्या नावावर न करता ती स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे व पैसे परत न केल्याचे उघड झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे यांनी तपास सुरू केला. विशेष पथकाने पुणे व सातारा येथे छापे टाकून दोन्ही आरोपींना अटक केली.त्यांना कोरेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती यवतकर यांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news