Koyna Dam : ‘कोयना’ गतवर्षीच्या तुलनेत वीज निर्मितीत वाढ

६० द.ल.यु. जादा वीज निर्मिती; पूर्व, पश्चिम प्रकल्पांसाठी २०.९४ टीएमसी पाणीवापर
Koyna Dam
Koyna Dam
Published on: 
Updated on: 
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : यावर्षी अल निनोचा धोका व हवामान खात्याचा कमी पावसाचा अंदाज या भीतीतून ऑगस्ट महिनाखेर कमालीची जलविद्युत निर्मिती कमी झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात या सर्व परिस्थितीवर मात करत गतवर्षीच्या तुलनेत वीजनिर्मितीची तूट भरून काढत काेयनेत आत्तापर्यंत ५९.४६७ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाल्याची समाधानकारक आकडेवारी समोर आली आहे.

कोयना धरणातील पाण्याअभावी मे महिन्यात जलविद्युत निर्मिती ठप्प झाली होती तर पूर्वेकडे सिंचनाचे पाणी बंद करून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याची दुर्दैवी वेळ आली होती. नव्या तांत्रिक जलवर्षात जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यानंतर जुलैसह ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला परंतु सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस पडलाच नाही.

या जल वर्षांत आत्तापर्यंतच्या चार महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे १५.७७ टीएमसी पाण्यावर ७४८.०२४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी १३.७७ टीएमसी वर ६४५.७३२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे २ टीएमसी पाणीवापर जादा झाल्याने १०२.२९२ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यावर्षी सुरुवातीला सिंचनापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यात आले व त्यानंतर सिंचनासाठी सोडलेल्या २.७३ व पूरकाळातील २.४४ अशा ५.१७ टीएमसी पाण्यावर २३.०७२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.

गतवर्षी लवकरच पाऊस सुरू झाल्याने सिंचनासाठी त्या काळात पाणी सोडण्यात आले नव्हते परंतु पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सोडलेल्या १३.७२ टीएमसी पाण्यावर ६५.८९७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी ८.५५ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने २२.८२५ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता या जलवर्षात आत्तापर्यंत एकूण केवळ २०.९४ टीएमसी पाण्यावर ७७१.०९६ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी २७.४९ टीएमसी पाण्यावर ७११.६२९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत ६.५५ टिएमसी पाणीवापर कमी झाला असला तरी यावेळी पश्चिमेकडे तुलनात्मक जादा पाणीवापर झाल्याने ५९.४६७ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news