Shambhuraj Desai: कोयना दौलत डोंगरी महोत्सवात सव्वा कोटींची उलाढाल

पालकमंत्री शंभूराज देसाई; कृषीसह पशुपक्षी प्रदर्शनामुळे बळीराजाला फायदाच
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai(File Photo)
Published on
Updated on

कराड : दौलतनगर (मरळी, ता. पाटण) येथे 2 ते 9 एप्रिल दरम्यान झालेल्या कोयना दौलत डोंगरी सव्वा कोटीपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या नऊ दिवसीय महोत्सवात बोटीग, घोडेस्वारी, पॅराग्लायडीग, घोडा व उंट सफारी, इलेक्ट्रिकल बग्गी राईड, कार्निवल परेड, खादयजत्रा, कृषी व पशु पक्षी प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, महिला बचत गटांच्या वस्तूंची विक्री दालने ड्रोन शो इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना - दौलत डोंगरी महोत्सवास पर्यटकांनी दिलेला प्रतिसाद व स्थानिक जनतेची मागणी विचारात घेऊन सदर महोत्सवास दि. 7 एप्रिल ते दि. 9 एप्रिल 2026 या कालावधीची वाढ करण्याची घोषणा केली.

वाढीव तीन दिवसाच्या कालावधीत बोटींग, पॅराग्लायडींग, फनफेअर, खाद्य जत्रा इत्यादी उपक्रमांसहीत 7 एप्रिल, 2026 रोजी भक्ती गीते व भावगीतांचा स्वर दौलत संध्या कार्यक्रम, 8 एप्रिल, 2026 रोजी द फोक लोक हा मराठी लोककला आधारीत कार्यक्रम व 9 एप्रिल, 2026 रोजी अवधूत गुप्ते लाईव संगीत मैफील व मानसी नाईक, योगीता चव्हाण, पूर्वा शिंदे, कविता राव यांचा नृत्यविष्काराचा कार्यक्रम रंगला. 2 एप्रिल ते 9 एप्रिल, 2026 अशा एकूण 8 दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 च्या आयोजनास सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली, असेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news