Koyna Dam: कोयना धरण पायथा वीजगृहातून पाणी सोडले

धरणात १०३.७५ टीएमसी पाणीसाठा
Koyna Dam
Koyna Dam
Published on
Updated on

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागात पडणारा पाऊस, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक व संपुष्टात आलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेता रविवारी सकाळी धरण पायथा वीजगृहातील २० मेगॅवॅट क्षमतेच्या एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १०५० क्यूसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी ६,७९० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या उपलब्ध १०३.९५ टीएमसी तर उपयुक्त ९८.८३ टीएमसी पाणीसाठा आहे. १ जूनपासून आत्तापर्यंत कोयना ४०८६ मिलिमीटर, नवजा ५२६१ मिलिमीटर व महाबळेश्वर येथे ५०४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ १.३० टीएमसी पाण्याची गरज असून सध्या धरण ९८.७६ टक्के भरले आहे.

दरम्यान धरणातील पाणी साठवण क्षमता आता जवळपास संपुष्टात आल्याने धरणात पाण्याची आवक वाढली तर धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर पाणी सोडण्याच्या शक्यताही कोयना सिंचन विभागाकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news