Koyna Dam: कोयना धरणात ६.४५ टीएमसीची भर

धरणातील पाण्याची पातळी ९.११ फुटांनी वाढली असून पाणीसाठा ४४.५७ टीएमसी इतका झाला
Koyna Dam: कोयना धरणात ६.४५ टीएमसीची भर
Published on
Updated on

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी ५ वाजता धरणात प्रतिसेकंद ७९ हजार ७०८ क्युसेक पाण्याची आवक होत होती आणि यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात बुधवार सायंकाळपर्यंतच्या २४ तासात ६.४५ टीएमसी पाण्याची भर पडली होती.

धरणातील पाण्याची पातळी ९.११ फुटांनी वाढली असून पाणीसाठा ४४.५७ टीएमसी इतका झाला आहे. तालुक्यात ७८ घरांची पडझड झाली असून अनेक घरांवरील पत्रे उडाले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. झाडे, वीज खांब कोसळल्याने अडथळे निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news