Koyna Dam: कोयना धरणाचे वक्र दरवाजे २ फुटांवर

कोयना धरणाचे वक्र दरवाजे चार फुटांवरून दोन फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत
Koyna Dam
Koyna Dam(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पाटण : कोयना धरणाचे वक्र दरवाजे चार फुटांवरून दोन फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

दरम्यान, धरणातून कोयना नदीत केला जाणारा विसर्ग आणि पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात होणारी पाण्याची आवक घटल्याने शुक्रवारी सकाळच्या तुलनेत सायंकाळी पाणीसाठ्यात काही प्रमाणात घट झाली आहे.

कोयना, महाबळेश्वर, नवजा यासह पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून, कोयना धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण व पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळी धरणाचे ६ वक्र दरवाजे ४ फुटांवरून ३ फूट करण्यात आले होते. तर सायंकाळी ६ वाजता वक्र दरवाजे आणखी एका फुटाने कमी करून ते २ फुटांवर स्थिर करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news