Koyna dam |
Koyna dam | दहा दिवसांनी कोयना धरणाचे वक्र दरवाजे बंदFile Photo

Koyna Dam | दहा दिवसांनी कोयना धरणाचे वक्र दरवाजे बंद

पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच; नदीकाठच्या गावांना दिलासा
Published on

पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्‍या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पायथा वीजगृृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेच सातारा व सांगली जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी 15 जुलैला सकाळी 11 वाजता सहा वक्र दरवाजे प्रथम उघडले होते. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरूच होता. बुधवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला असला तरी धरणात येणारे पाणी लक्षात घेत गुरूवारी दुपारी धरणाचे सर्व सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

धरणात गुरूवारी सायंकाळी प्रतिसेकंद 19 हजार 974 क्युसेक पाण्याची आवक होत होती. धरणात सध्या 77.40 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनानगर येथे 2 हजार 576 मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे 2 हजार 687 मिलिमीटर तर महाबळेश्वरमध्ये 2 हजार 682 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news