Koyna Dam: कोयना धरणाचे सर्व ६ वक्र दरवाजे दोन फुटांवर

धरणात प्रतिसेकंद १४ हजार ८ क्युसेक पाण्याची आवक
Koyna Dam
Koyna Dam
Published on
Updated on

पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्‍या हलक्या व मध्यम सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद १४ हजार ८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. या पार्श्वभूमीवर धरणाची संपुष्टात येत असलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेत धरणाचे सर्व ६ वक्र दरवाजे २ फुटापर्यत उचलण्यात आले आहेत.

कोयना धरणात ९७.०७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ ८ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे वक्र दरवाजे १ फुटावरून २ फुटापर्यत उचलून प्रतिसेकंद १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचवेळी पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

त्यामुळे कोयना नदीत एकूण प्रतिसेकंद १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्‍या पाणी पातळीत वाढ होत आहे. १ जूनपासून आत्तापर्यंत कोयना ३६६१ मिलिमीटर, नवजा ४७९३ मिलिमीटर, महाबळेश्वर ४७९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news