

कोरेगाव : कोरेगांव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेपूर्वीच आ. महेश शिंदे यांनी वेताळगल्ली (टेक) परिसरात तब्बल 3.50 कोटी रुपयांच्या निधीतून कोरेगांव शहरात पहिल्यांदाच स्कोबेल स्टोनद्वारे रस्त्यांचे सुशोभिकरण करुन टेक विभाग उजळवून टाकला आहे. यामुळे शहरातील प्रभाग क्रं. 9 मध्ये विकासगंगा वाहण्यास सुरूवात झाली आहे.
कोरेगांवमधील प्रभाग 9 चे प्रतिनिधीत्व सौ. संजीवनी सचिन बर्गे या करतात. मात्र, विकासकामे होत नसल्याने सचिन बर्गे यांनी आ. महेश शिंदे यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सार्थकी लागला आहे. प्रभागातील बाजारपेठ परिसर, भैरवनाथ मंदीर परिसर, हनुमान घाट, जानाई गल्ली, सम्राट गल्ली या सर्वच विभागातील कामांसाठी कोट्यवधींचा निधी आ. महेश शिंदे यांनी दिला आहे. यातूनच दर्जेदार कामे होत आहे.
शहरातच प्रथमच स्कोबेल स्टोनद्वारे सुशोभिकरणासाठी साडे तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. आ. महेश शिंदे चौक सुशोभिकरणासाठी स्कोबेल स्टोनचा वापर केला जात आहे. वेताळगल्लीत प्रथमच याचा वापर केल्याने हा परिसर उजळून निघाला आहे.
दरम्यान, आ. महेश शिंदे यांनी या कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक सचिन बर्गे, अजित बर्गे, संतोष बर्गे, निशांत माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निधी अभावी मागे राहिलेला आमचा प्रभाग मन अस्वस्थ करणारा होता. याचवेळी नेहमीच पाठीशी उभे असणार्या मित्रांनी आ. महेश शिंदे यांच्यासोबत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मी मित्रांनी दिलेल्या हाकेला साद देऊन आमदार महेश शिंदेंसोबत गेलो. आज खर्या अर्थाने हा निर्णय सार्थ ठरला आहे. ज्यांना साधी गटारे करता आली नाहीत ते आज कोरेगांव शहरात अवास्तव विकास निधी टाकल्याच्या वल्गना करत आहेत, त्यांनी आता वेताळगल्ली (टेक) परिसरातआणि प्रभाग 9 मधील सर्व विभागात येऊन विकास काय असतो हे पहावे असे आवाहन माजी नगरसेवक सचिन बर्गे यांनी केले आहे.