

वडूज : येथील स्वयंवर मंगल कार्यालयात खटाव-माण केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मॅटवरील कुस्तीचा थरार रंगला. आ. गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. बंडा गोडसे, ज्येष्ठ नेते विश्वास काळे, काका बनसोडे, सोमनाथ जाधव, विजयराव शिंदे, सचिन माळी, जयवंत पाटील, शहाजी गोडसे, मनोज कुंभार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. पडळकर म्हणाले, ग्रामीण भागातील मल्लांनी आता मॅटवरील कुस्तीकडे वळणे गरजेचे आहे. खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातील मुलांना चांगली संधी आहे. मुख्यमंत्री देवाभाऊंमुळे राज्यातील खेळाडूंना मोठी ऊर्जा मिळत आहे.
या स्पर्धेची सांगता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महाराष्ट्र केसरी पैलवान बापूराव लोखंडे, सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. धनंजय पाटील आटकेकर यांच्या उपस्थित झाली. यावेळी खटाव-माण तालुका केसरी 2025 स्पर्धेत विजेते ठरलेल्या पै.राहुल कोरडे (मायणी) याचा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन गौरव करण्यात आला. वडूजचा श्रीधर गोडसे हा उपविजेता ठरला.
या स्पर्धेत 14 वर्षे मुलांच्या 32 कि.ग्रॅम वजन गटात स्वराज शरद मदने कोकराळे, विश्वजीत दादा ढवळे म्हसवड, आदर्श शंकर गंबरे पळशी, 37 किलो वजन गटात शौर्य जानकर वडूज, रवी विलास पाटोळे मांडवे, सत्यजीत दादा ढवळे रांजणी, 42 किलो गटात कुर्मदास अजित काळेल जांभुळणी, संग्राम आबाजी जाधव म्हसवड, गणेश मधुकर भिसे लोणी, 48 किलो गटात विघ्नेश नितीन शेंडगे डिस्कळ, श्रेयस भिमराव राजगे, धनराज नवनाथ राजगे पिंपरी, 17 वर्षे वयोगटात 58 किलोमध्ये देवदास संजय जाधव कलेढोण, गुरु संभाजी नेटके मोही, नानासाहेब सोमेश्वर रुपनवर म्हसवड, 65 किलो गटात रोहित उत्तम मदने पर्यंती, राज शशिकांत माने म्हासुर्णे, स्वप्नील महादेव तरंगे पिंपरी, 72 किलो गटात तन्मय सुर्यकांत कदम नांदोशी, अनिकेत विजय देवकर मोही, सोहम प्रकाश मांडवे नागाचे कुमठे, 80 किलो वजन गटात गणेश गोरख फडतरे नागाचे कुमठे, विशाल शिवाजी रुपनवर म्हसवड, गणेश भिमराव खाडे पळशी, तर 81 ते 95 किलो वजन गटात राहुल कोरडे मायणी, श्रीधर मानवेंद्र गोडसे वडूज, संकेत भगवान कदम सातारा यांनी यश संपादन केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमास भाजपा खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण, प्रा. बंडा गोडसे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, चिन्मय कुलकर्णी, प्रा.अमोल साठे, सागर काळे, कुस्तीगीर संघाचे खटाव तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, अनिल गोडसे यांच्यासह कुस्ती शौकीन व जिल्हा कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सातारा कराड, मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा मोठ्या शहरात होणारी मॅटवरील स्पर्धा वडूज सारख्या तालुका स्तरीय गावात यशस्वी केल्याबद्दल संयोजक श्रीकांत काळे यांचा सत्कार करण्यात आला. उमेश पाटील, प्रसाद जगदाळे यांनी कुस्त्यांचे समालोचन केले.